Friday, October 23, 2026
Homeचंद्रपूरअखेर महिलेचा बळी घेणारा वाघ जेरबंद..!

अखेर महिलेचा बळी घेणारा वाघ जेरबंद..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील शंकरपुर पासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या लावारी गावाजवळील शेत शिवारात गुरुवार १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास शेतातील धान निंदणी करणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेस वाघाने ठार केल्याची घटना उघडकीस आली होती.विद्या कैलास मसराम वय ४० वर्षे,रा.लावारी,ता.चिमूर असे वाघाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे.प्रकरणी गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत वनविभागाच्या वाहनांना घेराव घातल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन महिलेचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा,अशी भूमिका लावारी गावकऱ्यांसह परिसरातील ग्रामस्थांनी रेटून धरली होती.त्यानुसार वनविभागाने घटनास्थळ परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले होते.वाघ वारंवार त्या भागात फिरत असल्याचे कॅमेऱ्यातून स्पष्ट झाल्यानंतर,काल शुक्रवारी घटनास्थळाजवळ पिंजरा लावण्यात आला व रात्रीच्या सुमारास वाघ पिंजऱ्यात अडकला आणि नरभक्षी वाघाचा धडकी भरवणारा प्रवास थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.. -अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेच्या संबंधित...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा...

अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली; पीएम किसान योजनेचे दोन हजार येणार बँक खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून प्रतीक्षा संपली आहे.येत्या,शुक्रवार...

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!