Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरअखेर एकमेकांनी लेखी माफीनामा लिहून दिल्याने वादावर पडला पडदा… - ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या...

अखेर एकमेकांनी लेखी माफीनामा लिहून दिल्याने वादावर पडला पडदा… – ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या ग्रामस्थाला ग्रामसेवकानी मारहाण केल्याचे प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चिमूर(चंद्रपूर) :- चिमूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खडसंगी जवळील गट ग्रामपंचायत शिवापूर (बंदर),ग्राम पंचायतीमध्ये शुक्रवारी दि.१४ जून रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या केसीसी कंपनीला दिल्या जाणाऱ्या पाण्यावरून प्रश्न विचारणाऱ्या ग्रामस्थाला महिला ग्रामसेवक यांनी मारहाण केल्याची घटना घडली.या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या युवकालाही ग्रामसेवकांनी मारहाण केल्याने वातावरण चांगलेच तापले.अखेरीस ग्रामसेवक,ग्रामपंचायत कमिटी व मारहाण झालेले तन्मय मेश्राम यांनी ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात एकमेकाबद्दल दिलगिरी व्यक्त करून, झालेल्या प्रकरणाबाबत एकमेकांना लेखी माफीनामा लिहून दिल्याने वादावर अखेर पडदा पडला.

ग्रामसभेत केसीसीला दिल्या जाणाऱ्या पाण्याचा विषयावर गदारोळ झाला.ग्रामपंचायत सचिव यांनी सहा महिने होऊन सुद्धा पारित ठरावानुसार केसीसी कंपनीला नोटीस बजावली नाही; अशी माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली.केसीसी कंपनीला कोणत्या आधारावर पाणी देत आहात व त्याबाबत असलेले पत्र ग्रामपंचायत ग्रामसेविका ग्रामसभासद तन्मय मेश्राम यांनी विचारणा केली.यावेळी महिला सचिव प्रतिभा कन्नाके यांनी तन्मय मेश्राम याला मारहाण केली.दरम्यान झरी (मांगरुड) येथील युवक रोशन बावणे हा ग्रामसभेचे व्हिडिओ घेणा-या रोशन बावणे या युवकाला सुद्धा भर ग्रामसभेत मारहाण केली.याप्रकरणी पोलिस घटनास्थळी दाखल होऊन दोघांकडून बयाण नोंदवून घेतले.

दरम्यान सायंकाळीं ६ वाजताच्या दरम्यान चिमूर पोलिस स्टेशनला ग्रामपंचायत ग्रामसेविकासह ग्रामपंचायत कमिटी व मारहाण झालेले तन्मय मेश्राम दोघेपण जाऊन यावेळी ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात एकमेकाबद्दल दिलगिरी व्यक्त करून, लेखी माफीनामा लिहून दिला.शिवाय या दरम्यान झालेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करीत पत्रकार परिषदेत एकमेकांची माफी मागितल्याचे त्यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!