Friday, October 16, 2026
Homeनागपूरअनियंत्रित कारच्या धडकेत पाच जण गंभीर जखमी

अनियंत्रित कारच्या धडकेत पाच जण गंभीर जखमी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- वाठोडा परिसरातील केडीके इंजीनियरिंग कॉलेजजवळ आज दि.१५ जून रोजी दुपारी एक भीषण अपघात घडला.यात एक भरधाव कार अनियंत्रित झाल्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर धडकली.यात या परिसरात उभे असलेले अनेक जण जखमी झाले.यासोबतच वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली.

घटनास्थळी मोठी गर्दी गोळा झाली. ही भरधाव कार एक अल्पवयीन तरुण चालवित होता. कार मालक एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती आहे.नंदनवन, सक्करदरा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी जखमींना मेडिकल रुग्णालयाच्या दिशेने रवाना करण्यात आले. जखमी झालेल्या गंभीर पाच जखमीपैकी दोन जखमींना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!