Saturday, April 18, 2026
Homeचंद्रपूरअखेर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षकास अटक... - मुंबईला पळून जाण्याच्या...

अखेर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षकास अटक… – मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असतांना अकोल्यातून अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका शाळेतील मुलीला अतिरिक्त शिकवणीच्या नावाखाली बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षक अमोल विनायक लोडे वय २८ वर्षे,रा.ता.कोरपना,जि.चंद्रपूर,याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अकोला येथील बसस्थानकावरून अटक केली आहे.अमोल लोडे हा कोरपना येथील युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष आहे.एका खासगी शाळेत पीडित विद्यार्थिनी सहावीत शिक्षण घेत होती उन्हाळ्याच्या सुटीत अतिरिक्त वर्ग भरविण्यात येत होते.ती मुलगीसुद्धा शिकवणीसाठी जात होती. दरम्यान,आरोपी शिक्षक अमोल लोडे याने तिचे लैंगिक शोषण केले तसेच ही बाब घरच्यांना सांगितल्यास आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्या पीडित मुलीने ही बाब कुणालाही सांगितली नव्हती.मात्र,घरच्यांना माहिती होताच त्यांनी मुलीची विचारपूस करून ठाण्यात धाव घेतली.पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षक अमोल लोडे याच्यावर कलम ३७६ पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला.मात्र, शिक्षक फरार होता.दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून आरोपी शिक्षक अमोल लोडे मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना अकोला येथील बसस्थानकावरून अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्त्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक बलराम झाडोकार,पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोउनि.मधुकर सामलवार,धनराज करकाडे,नितेश महात्मे आदींनी केली.अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची बातमी गावकऱ्यांना कळताच संताप व्यक्त करीत या घटनेचा निषेध म्हणून काल,बुधवारी कोरपना येथे निषेध रॅली काढण्यात आली.या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. तसेच कोरपना येथील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला.गुरुवारी या घटनेच्या निषेधार्थ कोरपना शहरात सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
आरोपी अमोल लोडे हा युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष होता.त्याने अत्याचार केल्याचा प्रकार समोर येताच युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून तसेच पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे.यासंबंधाने चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी तसे पत्रक जारी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!