Wednesday, June 10, 2026
Homeनागपूरशेजाऱ्यांना आली शंका; दार हलवून बघितले तर चौघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत... -...

शेजाऱ्यांना आली शंका; दार हलवून बघितले तर चौघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत… – आई-वडील व दोन मुलांनी गळफास लावून केली आत्महत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आई-वडील व दोन मुलांनी आत्महत्या केल्याने नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका हादरला आहे.पतसंस्थेतील गैरव्यवहाराच्या आरोपात अटकेमुळे बदनामी झाल्याने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमधून स्पष्ट होत असल्याचे नरखेड पोलिसांचे म्हणणे आहे.एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
सेवानिवृत्त शिक्षक विजय मधुकर पचोरी वय ६८ वर्षे, पत्नी माला विजय पचोरी वय ५३ वर्षे,मुलगा गणेश विजय पचोरी वय ३८ व दीपक विजय पचोरी वय ३६ वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या चौघांची नावे आहेत. विजय पचोरी २०१६ मध्ये निवृत्त झाले होते.ते पत्नी व दोन मुले यांच्यासह गावातील ओमप्रकाश जानराव खोब्रागडे यांच्याकडे भाड्याने राहात होते.काल, सकाळी कुटुंबातील कुणीही उठले नसल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला.परंतु कुणीही बाहेर आले नाही.बराच वेळानंतरही कुणी बाहेर आले नसल्याने शेजाऱ्यांना शंका आली.त्यांनी दार हलवून बघितले तर चौघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.शेजाऱ्यांनी तत्काळ नरखेड पोलिसांना सूचना दिली. पोलिस तात्काळ पोहोचले.दार आतून बंद होते.पोलिसांनी दार उघडताच धक्का बसला. घरातील चौघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आले.तीन मृतदेहांचे हात बांधलेल्या अवस्थेत होते.पोलिसांनी सर्व मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला.गणेश विजय पचोरीच्या खिश्यात एक सुसाईड नोट आढळून आली आहे.
यावर चौघांच्याही स्वाक्षरी आहेत.गणेश विजय पचोरी हा पांढुर्णा येथील मातृसेवा इंडिया निधी लिमिटेड पतसंस्थेत संचालक होता.त्याच्यावर आर्थिक फसवणूक बद्दल गुन्हा दाखल आहे.त्याला १६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.मागील ऑगस्ट महिन्यात त्याला जामीन मिळाला.या कारणाने आत्महत्या केली असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!