Saturday, April 18, 2026
Homeकोंढाळाविकसित भारतासाठी कुटुंबियांपासून सुरुवात करणे आवश्यक-आमदार कृष्णा गजबे -कोंढाळा येथे 'लाभार्थी सन्मान...

विकसित भारतासाठी कुटुंबियांपासून सुरुवात करणे आवश्यक-आमदार कृष्णा गजबे -कोंढाळा येथे ‘लाभार्थी सन्मान यात्रा’ संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-शासनाच्या विविध योजनांचा प्रसार, प्रचार आणि लाभार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ‘लाभार्थी सन्मान यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना विकसीत भारत बनविणे आहे.विकसीत भारत बनवायचे असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या गाव पातळीवरील कुटुंबियांपासून सुरुवात करून तालुका,जिल्हा आणि राज्य पातळीवर सहभाग घ्यावा लागेल; असे मत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केले. देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे लाभार्थी सन्मान यात्रेचा शुभारंभ काल,बुधवार २ ऑक्टोंबर रोजी गावातील दत्त मंदिर देवस्थान परिसर प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. लाभार्थी सन्मान यात्रेमध्ये ‘योजनांची जत्रा’ या संकल्पनेतून नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.यामध्ये मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना, माझी लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, अन्नपूर्ण योजना, तीर्थ दर्शन योजना, पीक विमा योजना, सुकन्या योजना व इतर योजनांची माहिती देत लाभार्थ्यांच्या समस्या तसेच अडी-अडचणींचे निवारण करण्यात आले.
प्रसंगी आमदार गजबे म्हणाले की, ‘लाभार्थी सन्मान यात्रा’ ही १०० टक्के लोकांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहचविण्यासाठी असून भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य माणसांचे केंद्रबिंदू म्हणून योजना काढलेल्या आहेत.भाजपा सरकार हे योजनांच्या माध्यमातून सर्वांना मदतीचा हात देत आहे.मुलींसाठी योजना,माझी सुकन्या योजना,३ सिलेंडर मोफत, वयोवृध्द वयोश्री योजनेच्या माध्यमातून वृध्दांना साहित्य खरेदीसाठी ३ हजार रुपये देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र संताची भूमी असल्याने तीर्थ दर्शन योजना आखण्यात आली आहे. जिल्ह्यातून तीर्थ दर्शनास येत्या ७ तारखेला ८०० भावीक श्रीरामांच्या दर्शनाला जाणार आहेत. एकट्या आरमोरी विधानसभा क्षेत्रातून ६०० जण जाणार आहेत.जलयुक्त शिवार योजना,शेतकऱ्यांचे वीज बिल माफ,सौर ऊर्जा कृषी पंप, महात्मा फुले जन आरोग्य योजना याच बरोबर गडचिरोली जिल्ह्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे. संपूर्ण भारताचे लक्ष गडचिरोली जिल्ह्याकडे आहे. जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्पाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. नुकतेच कोंढाळा गावातील मेंढा-बोडेगाव पांदन रस्त्यावर ३८ लाखांचा पुल मंजूर करण्यात आला आहे. असे ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते.प्रसंगी आमदार गजबे यांच्या हस्ते गावात नाली बांधकाम तसेच सभा मंडप मंदिर बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आमदार कृष्णा गजबे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा,तेलंगणाचे आमदार श्रीनिवास,माजी महिला व बालकल्याण सभापती रोषणीताई पारधी,माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना ढोरे,भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी,भाजपा उपाध्यक्ष शंकर पारधी,भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते पंढरी नखाते, विधानसभा विस्तारक रोशन ठाकरे,माजी सैनिक ज्ञानेश्र्वर चौधरी,गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!