- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागात आज,गुरुवार ७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यात आज दुपारच्या सुमारास गुरे चराई करीत असतांनाच अचानकपणे अंगावर वीज कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळनेरी गावानजीक शेतशिवरात घडली.गणेश भाऊराव धानोरकर वय ३२ वर्षे, रा.पिंपळनेरी,ता.चिमूर,जि.चंद्रपूर असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील रहिवासी गणेश धानोरकर हा तरुण शेतकरी आज गुरुवारी दुपारी पिंपळनेरी येथील शेतशिवारात गुरे चारत होता.यादरम्यान दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला.यावेळी गणेशच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आला.
- Advertisement -

