Monday, September 7, 2026
Homeभंडारा३५ वर्षीय तरुणाचे अल्पवयीन मुलीशी लग्न; मुलगी गर्भवती.. - तरुणावर पॉक्सो कायद्यानुसार...

३५ वर्षीय तरुणाचे अल्पवयीन मुलीशी लग्न; मुलगी गर्भवती.. – तरुणावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील एका ३५ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केले.लग्नानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी ३७ आठवडे,६ दिवसांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासात उघड झाले. अल्पवयीन मुलगी गभर्वती राहिल्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लाखनी पोलिसांनी प्रदुम्न हरीचंद्र वरठे वय ३५ वर्षे,रा.पिंपळगाव  याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार,प्रदुम्न वरठे याने पीडित अल्पवयीन मुलीसोबत १७ फेब्रुवारी २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत शरीरसंबंध ठेवले.त्यातून ही पीडिता ३७ आठवडे,६ दिवसांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले असून सध्या पीडितेवर भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी लाखनी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ६४(२)(१) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!