- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्याच्या घडीला जवळपास नव्वद टक्के लोकं रेडिमेट कपडे म्हणजेच आयती शिवलेले कपडे घेण्यास पसंती दर्शवू लागले आहेत. कोण टेलरकडे जाऊन कपडे शिवून घेणार व कोण वाट बघत राहणार,त्यामुळे हल्ली रेडिमेट कपड्यांचा ट्रेण्ड वाढलेला दिसून येतो.मात्र,याला अपवाद म्हणून आजही काहीजण टेलरकडे कपडे शिवतांना आढळून येतात.पण सांगितल्याप्रमाणे एखाद्या टेलरने शर्ट न शिवल्यास आपण चुप्पी साधून जाऊ द्या.! असे म्हणून टेलरला सोडून देतो.मात्र,एका ग्राहकाने जुन्या शर्टप्रमाणेच नवीन शर्ट शिवण्यात यावे,असे सांगूनही टेलरने मापाचा शर्ट शिवला नाही म्हणून संतापलेल्या एका ग्राहकाने टेलरला थेट ग्राहक न्यायालयात खेचले.प्रकरणी ग्राहक न्यायालयाने ग्राहकाच्या तक्रारीवरून दुकानदाराला नुकसानभरपाई म्हणून १२ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना केरळमधील एर्नाकुलम जिह्यात घडली आहे.
केरळमधील थ्रिक्काकारा येथील थॉमस जिमी यांनी पलारीट्टोममधील एका शिलाई दुकानदाराकडे नवीन शर्ट शिवायला टाकला होता.यासाठी थॉमस यांनी आपला जुना शर्ट मापासाठी दिला होता.जुन्या शर्टप्रमाणे नवीन शर्ट शिवण्यात यावा,असेही शिंप्याला सांगितले होते,परंतु थॉमस यांना जेव्हा नवीन शर्ट मिळाला,त्यावेळी तो योग्य मापात शिवला नव्हता.टेलरच्या चुकीमुळे आपल्याला झालेले आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रासाची भरपाई मिळावी, अशी विनंती थॉमस यांनी ग्राहक न्यायालयाकडे केली. स्पष्ट सूचना आणि योग्य पैसे देऊनही टेलर योग्य सेवा पुरवण्यात अयशस्वी झालेला दिसत आहे. टेलरला १२,३५० रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे.या दंडाच्या रकमेत ५५० रुपये शिलाई शुल्क,१८०० रुपयांच्या कापडाची किंमत आणि न्यायालयीन खर्चासाठी ५ हजारांचा खर्च याचा समावेश आहे,असे ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे.अश्या अनोख्या प्रकरणामुळे व ग्राहक न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अनेकजण अचंभित झाले आहेत.
- Advertisement -

