उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज :- नगर परिषद हद्दीत येणाऱ्या जुनी वडसा येथील २६ वर्षीय तरुणाचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना आज १३ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार,चव्हाण वार्ड,रा.जुनी वडसा येथील २६ वर्षीय तरुण अनिकेत खंडाळे रात्रो अंदाजे १२ ते १ वाजेच्या सुमारास लघु शंकेस उठला असता; पायाला काहीतरी दंश केला असल्याची त्याला जाणीव झाली.मात्र त्याकडे त्याने दुर्लक्ष केले.नंतर काही वेळाने प्रकृती बिघडू लागल्याने देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.अशातच प्रकृती खालावल्याने अखेर आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मावळली.
अनिकेत मृत्यू पावल्या नंतर घरीच दांड्या काडीचा साप दिसला व त्याला मारण्यात आले.अनिकेत मोल मोजुरी करून उदरनिर्वाह करीत होता.नुकतेच काही वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते.त्याच्या पश्चात पत्नी व परिवार असल्याने त्याला शासनाकडून काही मदत मिळावी; यासाठी गोर गरीब जनता-जनार्दन यांसाठी रात्रंदिवस झटणारे माजी नगरसेवक सचिन खरकाटे प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.अनिकेत खंडाळे मृत पावल्या प्रकरणी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.