Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरहॉटेलात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर; ३३ सिलेंडर जप्त..

हॉटेलात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर; ३३ सिलेंडर जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र  घरगुती वापराचे गॅस सिलेंडर हॉटेल,बार,ढाबे,टी-शॉप, चिकन सेंटर तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये वापरल्या जात आहेत.घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणे हा गंभीर व दखलपात्र गुन्हा आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती गॅस पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होत असतांनाही काहीजण ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पुरवठा विभागाने धडक मोहीम राबवून तब्बल ३३ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर व कोरपना शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरपना व गडचांदूर शहरातील विविध भागांतून अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी अन्न व पुरवठा विभागाकडे करण्यात आल्या होत्या.शासनाच्या अनुदानाचा गैरफायदा घेत व्यावसायिक वापर करून महसूल बुडवला जात असल्याने,निरीक्षण अधिकारी व त्यांच्या पथकाने पूर्वसूचना न देता अचानक धाडी टाकत व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली.या धडक कारवाईदरम्यान शहरातील प्रमुख बाजारपेठ,वर्दळीचे चौक,हॉटेल पट्टा व इतर भागांत तपासणी करून अनेक नामांकित हॉटेल्स,बार,ढाबे,टी-शॉप व चिकन सेंटरमधून घरगुती वापरासाठी असलेले एकूण ३३ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.घरगुती वापराचे गॅस व्यवसायिक आस्थापनांमध्ये वापरल्या जात असेल,तर अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी सदरची मोहीम यापुढेही अधिक तीव्रपणे,सातत्याने आणि कठोरपणे राबवली जाईल,असे कोरपना तहसील कार्यालयाच्या अन्नपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!