Saturday, August 29, 2026
Homeभंडाराट्रकला ओव्हरटेक करतांना पिकअप वाहनाची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू..

ट्रकला ओव्हरटेक करतांना पिकअप वाहनाची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रियल इस्टेटचे काम करणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाचा पिकअप वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास भंडारा-तुमसर मार्गावरील मोहगाव(देवी)गावाजवळ घडली.दुचाकीने जात असतांना समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला,पण समोरून पिकअप वाहन आल्याने समोरासमोर जोरदार धडक होऊन मृत्यू झाला.दिगंबर तेजलाल तुरकर वय २९ वर्षे,रा.डोंगरगाव, ता.जि.गोंदिया असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
दिगंबर तुरकर हा नागपुरातील एका कंपनीशी  संबंधित रियल इस्टेटचे काम करायचा.कामानिमित्त भंडारा जिल्ह्यात आला होता.येथील कामे आटोपून तो नागपूरला निघण्याच्या बेतात होता.दरम्यान,काल शनिवारी एमएच ३१ जीबी ५३७३ क्रमांकाच्या दुचाकीने तुमसरकडून भंडाऱ्याकडे जात असतांना मोहगाव(देवी) गावाजवळील मार्गावर पुढे ट्रक असल्याने ट्रकच्या पुढे जाण्याच्या तयारीत असतांनाच समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला दुचाकी जाऊन धडकली.धडक इतकी भीषण होती की,दुचाकीचा चेंदामेंदा होऊन दिगंबरचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच वरठीचे पीएसआय मस्के पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.घटनेने तुरकर कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर येत  नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या...

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!