उद्रेक न्युज वृत्त
नितेश केराम/चंद्रपूर विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तसेच विदर्भातील शेतकरी संघटनेचे नेते तथा वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे वामनराव चटप यांनी रविवार दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता राजेंद्र पचारे यांचे राजुरा येथील निवास्थानी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भेट दिली.राजेंद्र पचारे हे ३१ मार्च ला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले.शासकीय सेवेत असतांना पचारे यांनी सर्वांशी आपुलकीचे,जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबध ठेवले होते.दरम्यान सेवानिवृत्त निमित्ताने काल रविवारला सकाळी राजेंद्र पचारे व त्यांच्या अर्धांगिनी ज्योती पचारे यांचा माजी आमदार वामनराव चटप यांनी शाल व पुषपगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रसंगी शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.