Sunday, August 16, 2026
Homeभंडारासावधान..! गुपचुपमुळे विषबाधा..

सावधान..! गुपचुपमुळे विषबाधा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शहरांपासून ते आता ग्रामीण भागातही गुपचुप मिळू लागलेत.लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लोकं मोठ्या आवडीने गुपचुप खातात.पण मिळणारे गुपचुप हे पुरेशी स्वच्छता किंवा खाण्याच्या दृष्टीने योग्य आहेत की नाहीत,हे कुणीही लक्ष देत नसल्याने एखादेवेळी अनुचित प्रकार घडत असतात.असाच प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरातील गांधी शाळेसमोरील फुटपाथवर असलेल्या गुपचुप ठेल्यावर नुकताच घडला.एका ठेल्यावरून गुपचुपची चव घेणे नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे.गुपचुप खाल्ल्यानंतर सुमारे १० ते १२ जणांना उलटी,चक्कर व पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने सर्वांची घाबरगुंडी झाली आणि विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे सर्वजण उपचारासाठी डॉ.चंद्रशेखर निंबार्ते यांच्या खासगी रुग्णालयात दाखल झाले. डॉ.निंबार्ते यांनी तातडीने उपचार सुरू करून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर केली.सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.दरम्यान,ही घटना समजताच  संबंधित गुपचुप विक्रेता घटनास्थळावरून पसार झाला.उघड्यावर पदार्थ विकणाऱ्या दुकानात स्वच्छतेचा अभाव असल्याने अशा घटना घडतात. अस्वच्छ खाद्य पदार्थापासून नागरिकांनी दूर राहावे. पावसाळा व उन्हाळ्यात अशा विषबाधेचा धोका अधिक वाढतो.त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात तरुण आढळला गळफास घेतलेल्या अवस्थेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डन समोरील चुनाभट्टी जवळच्या जंगल परिसरात एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

केवळ इमारती,दुरुस्ती आणि भौतिक सुविधा निर्माण करणे अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर – ‘आदर्श’ व ‘पीएम श्री’...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र व राज्य शासनाकडून शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा वेळेत व उद्देशानुरूप विनियोग झाला...

आदर्श शाळांची संख्या वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर-राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात...

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!