Monday, October 12, 2026
Homeचंद्रपूरसलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची 'इंडिया बुक...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून ‘सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास’ हे ८३ पानांचे हस्तलिखित पुस्तक पूर्ण करत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ (India Book of Records)मध्ये आपली अधिकृत नोंद केली आहे. नुकतेच तिला राष्ट्रीय स्तरावरील अधिकृत सुवर्ण पदक(Medal),प्रमाणपत्र(Certificate)आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
  • संगीताची परंपरा आणि शैक्षणिक यश👇
वैष्णवी ही ऑल इंडिया रेडिओ(आकाशवाणी नागपूर) ची मान्यताप्राप्त ‘बी-ग्रेड’ सुगम संगीत कलाकार आहे. तिने संगीतात विशारद पदवी प्राप्त केली असून, गोंडवाना विद्यापीठातून पदवी परीक्षेत ‘सुवर्णपदक’ (Gold Medal)मिळवून विशेष प्राविण्य संपादन केले आहे.तिला संगीताचे प्राथमिक व बहुमूल्य ज्ञान तिचे काका दिलीप मांडवकर यांच्याकडून लाभले.
  • कौटुंबिक पाठबळ व प्रोत्साहन👇
२४ तासांच्या या कठीण आणि आव्हानात्मक प्रवासात तिचे वडील विश्र्वंभर मांडवकर,आई माधुरी मांडवकर आणि भाऊ कार्तिक मांडवकर यांनी सातत्याने सोबत राहून मोलाचे प्रोत्साहन व ऊर्जा दिली.आई-वडील,भाऊ आणि संपूर्ण मांडवकर परिवाराच्या खंबीर पाठबळामुळेच हे अभूतपूर्व यश साध्य करणे शक्य झाले असल्याचे वैष्णवीने सांगितले.तिच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल आणि राष्ट्रीय विक्रमाबद्दल एफइएस संस्था,शिक्षकवृंद, संगीत क्षेत्रातून तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सीईओचा कारवाईचा सपाटा; आता चातगावचा ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच काही दिवसांपूर्वी शासकिय निधीचे नुकसान करणे व इतर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक...

पायाला चिखल माखल्याने धुण्यासाठी मोठ्या नहराजवळ गेले अन् विपरीत घडले; पती-पत्नीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेत पाहण्यासाठी शेतीवर गेले असता पायाला चिखल माखल्याने पाय धुण्यासाठी गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याजवळ(मोठा नहर)गेले असता पत्नीचा पाय घसरला आणि ती पाण्यात...

अखेर ‘त्या’ तरुणाची ओळख पटली; रेल्वेने कटून शरीराचे झाले होते दोन तुकडे..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एका अज्ञात तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास देसाईगंज शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या देसाईगंज-गोंदिया मार्गावरील तुकुम परिसरातील...

आणखी एका शेतकऱ्याने तलावात उडी घेत संपवले जीवन..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी विहिरीत उडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!