उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी देसाईगंज नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या जुनी वडसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जंगी मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकी प्रसंगी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतीमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.पूजन,अभिवादन प्रसंगी माजी नगरसेवक सचिन खरकाटे,अमोल खरकाटे व ताराचंद पत्रे उपस्थीत होते.
संबोधी बुध्द विहार येथील अध्यक्ष दिपक सहारे यांनी रॅरीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती प्रतीमेचे पुजन करुन माल्यार्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमास जुनी वडसा वासीय शेकडो स्त्री पुरुष जनता उत्साहाने सहभागी होऊन सर्वांनी बंधूभाव एकात्मतेचे दर्शन घडवून आणले.कार्यक्रमाचे शेवट महिला समितीच्या अध्यक्षा वंदना सहारे यांच्या बुध्द वंदनेने करण्यात आले तर पंचशील युवा यांच्या वतीने तयार केलेला अल्पोपहाराचा सर्वांनी आश्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर मिरवणूक प्रसंगी पंचशील युवा कार्यकर्ते प्रशांत सुर्यवंशी,पवन मेश्राम यांची चमू,कोअर कमेटीचे सदस्य दिलीप उके उपस्थित होते तर संपूर्ण संबोधी महिला समितीच्या सर्व कार्यकर्त्या तसेच देवलाबाई मेश्राम व कमलाबाई शेंडे यांनी मोलाचे सहकार्य केले तर संबोधी बुध्द विहार येथील सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम येशस्वीतेसाठी सहकार्य केले असल्याने बंधूभाव एकात्मतेचे दर्शन शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने जुनी वडसा येथे दिसून आले.