Tuesday, April 21, 2026
Homeभंडाराशेतात काम करतांना अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी..

शेतात काम करतांना अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शेतात काम करत असतांना अचानकपणे अस्वलीने हल्ला चढवून शेतकऱ्यास जखमी केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भिवखिडकी जंगल परिसराच्या लगत असलेल्या शेत शिवारात काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.यात पवनी तालुक्याच्या केसलापुरी येथील
६५ वर्षीय शेतकरी तीरणदास सदाशिव आरिकर यांच्या अंगावर अस्वल धावून आल्याने चेहऱ्याच्या डाव्या बाजूच्या गालावरील कातडी निघून दुखापत झाली आहे.घटनेने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.
६५ वर्षीय शेतकरी तीरणदास आरिकर हे नेहमी प्रमाणे शेतावर गेले होते.शेतावर काम करत असतांना लगतच्या जंगल परिसरातून आलेल्या अस्वलीने शिकार समजून हल्ला चढवला.काळीघोर अस्वल पाहून शेतकऱ्याची भंबेरी उडाली.आरडा-ओरड करून तीरणदासने पळ काढला.मात्र,अस्वलीने हल्ला चढवल्याने चेहऱ्यावर दुखापत झाली.घटनेची माहिती वन विभागास मिळताच घटनास्थळाचा पंचनामा केला व जखमी शेतकऱ्यास पवनी तालुक्याच्या अड्याळ येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.हल्ली शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी शेतात जातात,मात्र वन्य प्राणी शेतकऱ्यांवर हल्ले चढवून जिवानिशी खेळू लागल्याचा प्रकार दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खेडेगावच्या जंगलात जुगाराचा डाव; अड्ड्यावर पोलीसांची धाड.. – तब्बल २२ आरोपींना अटक करून ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील खेडेगावच्या जंगलात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री ते आज मंगळवारी पहाटेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन कुरखेडा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!