उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यांची रक्कम वाढवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही रक्कम ६ हजारांवरून ८ हजार रुपयांपर्यंत वाढवली जावू शकते. हप्त्यांची रक्कम वाढवण्यात आली, तर दर तीन महिन्यांनी लाभार्थ्यांच्या खात्यात २ हजारांचा निधी प्राप्त होईल. सध्या दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना योजनेनुसार निधी वितरित केला जातो.
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पैसे वाढवण्याव्यतिरिक्त, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्व पिकांसाठी किमान समर्थन मूल्यावर (एमएसपी) पॅनेल स्थापन करण्याची घोषणा करतील,अशीही शक्यता आहे. दरम्यान जानेवारी महिन्याच्या अखेरीस पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १३ वा हप्ता येण्याची शक्यता आहे. या हप्त्याचे एकूण १३ कोटी शेतकरी कुटुंबे लाभार्थी असतील.