उद्रेक न्युज वृत्त
नितेश केराम/कोरपना ता.प्र.
कोरपना :- शेतकरी बांधवांच्या अडचणी व समस्या लक्षात घेता आगामी हंगामासाठी राष्ट्रीयकृत व सहकारी पिक कर्ज वाटप कार्यक्रम त्वरित घेण्यात यावा; अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते आबीद अली व शेतकरी बांधवांनी केली आहे.
शेतकऱ्यांचा यंदाचा हंगाम मार्च ते एप्रिल पासून संपला आहे.पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बांधव पुढे सरसावला आहे नांगरनी,वखरनी,बियाणे खरेदी व शेत मजुरांना मजुरी अदा करण्यासाठी शेकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे.यंदाच्या हंगामात कापसाला अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकरी वर्ग चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.कशी-बशी बसे जुडवा- जुडव करून मार्च महिन्यात आपले मागील वर्षाचे पिक कर्ज भरले आहेत.त्यामुळे त्यांच्याकडे आता दमडी सुद्धा उरली नाही.सोयाबीन, तूर,हरभरा व इतर शेत माल विक्रीतही शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी आर्थिक अडचणींचा सामना व शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त होऊन कसे-बसे उदरनिर्वाह करून जीवन जगीत आहेत.तसेच विवाह सोहळे,बोरवण कौटुंबिक कार्यक्रम आगामी काळात येऊन ठेपले आहेत.अशा परिस्थित शेतकऱ्यांनी काय करावे?अशी स्थिती निर्माण झाली आहे.बरेच शेतकरी बांधव यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत.त्यामुळे शासनाने शेतकरी बांधवांच्या अडचणी व समस्या लक्षात घेता राष्ट्रीयकृत बँकांनी पिक कर्ज त्वरित देण्यासाठी निर्देश द्यावे व शेतकरी बांधवांच्या अडचणी दूर करावीत अशी मागणी राकाँचे ज्येष्ठ नेते आबीद अली व शेतकरी बांधवांनी केली आहे.