Wednesday, March 11, 2026
Homeभंडाराशाळेत जाण्याचे स्वप्न भंगले; दहावीच्या विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू..

शाळेत जाण्याचे स्वप्न भंगले; दहावीच्या विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात हृदयाला चटका लावणारी घटना काल सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.सकाळच्या सुमारास मैत्रिणींसह शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीची वाटेत असणाऱ्या रस्त्यावरील चिखलामुळे सायकल स्लीप झाली. तितक्यात समोरून ट्रॅक्टर आला आणि ट्रॅक्टरच्या मागचा लोखंडी भाग विद्यार्थिनीच्या डोक्याला लागल्याने ती रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली आणि जागीच गतप्राण झाली.मैत्रिणीच्या किंकाळ्यांनी परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातात सिमरन श्याम ठवकर वय १५ वर्षे रा.बाम्हणी,ता.तुमसर असे जागीच मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती तुमसरच्या जनता विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी होती. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून पसार झाला होता.मात्र,पोलिसांनी काही तासांत ट्रॅक्टर जप्त करून चालक सुनील योगीलाल पटले वय ३८ वर्षे,रा.हसारा याला अटक केली आहे.
सिमरन सकाळी बाम्हणी येथून चार मैत्रिणींसोबत सायकलवरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. थोड्या अंतरावर गेली असतांना बाम्हणी-कोष्टी शिवारातील वळणावर एका घराजवळ रस्त्याशेजारी चिखल साचला आहे.त्या चिखलातून सिमरनची सायकल स्लीप झाली आणि एमएच ३६ एल ६१९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा मागील लोखंडी भाग लागल्याने शाळेत जाण्याचे स्वप्न भंगले.गरिबीतही शिक्षणाची गोडी मनात जपणारी आणि नियमित वेळेवर शाळेत जाणाऱ्या सिमरनच्या आयुष्याचा खेळ अपघाताने संपवला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे पोलिसांना पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात प्रलंबित ई-चालान वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.मात्र,या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी पोलीस वाहनचालकांना रस्त्यात अडवून 'दंड आत्ताच भरा,अन्यथा...

सरपण गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला; इसम ठार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जंगल परिसरात सरपण गोळा करीत असतांना वाघाने हल्ला चढवून एका इसमास ठार केल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील...

ऐतिहासिक यश; नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेस ‘आयएसओ’ मानांकन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर या शाळेला आज,बुधवार ११ मार्च रोजी ISO 9001:2015 Quality...

शिक्षकाचे पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी चपलेने बदडले..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आज,मंगळवार १० मार्च रोजी उघडकीस आली आहे.एका ५४ वर्षीय शिक्षकाने इयत्ता चौथीच्या पाच विद्यार्थिनींशी अश्लील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!