Friday, August 28, 2026
Homeआरमोरीशाळेतील मुलींना वाईट स्पर्श करणाऱ्या शिक्षकासह मुख्याध्यापिकेचेही निलंबन.. -आरमोरी शाळेतील प्रकरण...

शाळेतील मुलींना वाईट स्पर्श करणाऱ्या शिक्षकासह मुख्याध्यापिकेचेही निलंबन.. -आरमोरी शाळेतील प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली):-शाळेतील मुलींना वाईट स्पर्श करणाऱ्या आरमोरी येथील सीताबर्डी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिक्षक चंद्रभान बांबोळे वय ५० वर्षे याला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे.शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या  शिक्षकाला कडक शिक्षा द्यावी; अशी मागणी पालकांनी होती.चंद्रभान बांबोळे हा चौथ्या वर्गाचा वर्गशिक्षक असून मुलींच्या खांद्यावर हात ठेवणे, कमरेत हात घालणे,मुलींच्या खांद्यावर स्वतःचे डोके ठेवणे,खाऊ देऊन मुलींची पप्पी घेणे; अशा प्रकारचे असभ्य वर्तन वर्गातच करीत होता.त्याचे हे वर्तन बघून काही मुली दुसऱ्या वर्गामध्ये जाऊन बसत होत्या.

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक चंद्रभान बांबोळे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४ सहकलम १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.त्यानुसार त्याला
शिक्षण विभागाने त्याला निलंबित केले आहे.तसेच शाळेत होत असलेल्या गैरवर्तनाबाबत वरिष्ठांना कळवण्यात कसूर केल्याबद्दल मुख्याध्यापिका दिलेश्वरी दामोधर कोटांगले यांनाही शिक्षण विभागाने निलंबित केले आहे.महत्वाचे म्हणजे,चंद्रभान बांबोळे आरोपी शिक्षकाची मुख्य नियुक्ती ठाणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील आहे.मात्र,गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्याला आरमोरी शहरातील सीताबर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत पदस्थापना दिली.यापूर्वीही त्याने असाच प्रकार इतर शाळेत केलाय कां? याबाबत आरमोरी पोलीस प्रशासन त्या दिशेने तपास करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!