Wednesday, July 15, 2026
Homeदेसाईगंजशहरातील पथविक्रेत्यांनी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा.. - देसाईगंज मुख्याधिकारी...

शहरातील पथविक्रेत्यांनी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा.. – देसाईगंज मुख्याधिकारी सतिश चौधरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-कोरोना कालावधीत देशातील पथविक्रेते आर्थिक अडचणीत सापडले होते. याची दखल घेऊन पथविक्रेत्यांना भांडवल मिळावे, यासाठी केंद्र शासनाने पथविक्रेत्यांनी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी( पीएम स्वनिधी)योजना सुरू केली होती.याचा लाभ देशातील कोट्यावधी पथविक्रेत्यांना झाला.या योजनेचा कालावधी यापुर्वी  ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत होता.त्यामुळे अनेक पथविक्रेत्यांना आर्थिक अडचणीत सापडले होते.याची दखल घेऊन केंद्र सरकारने सदर योजनेचा कालावधी वाढवून ही योजना ३१ मार्च २३० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देसाईगंज शहरातील फेरीवाले,लघु उद्योजक व त्यांचे कुटुंबांना या योजनेचा लाभ घेणे अधिक सोयीचे ठरणार आहे.या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कर्ज मर्यादा पूर्वी १० हजार रुपये इतकी होतीती आता १५ हजार रुपये करण्यात आली आहे.दुसऱ्या टप्प्यातील कर्ज मर्यादा २० हजारांवरून २५ हजार रुपये करण्यात आली असून,तिसऱ्या टप्प्यातील कर्ज मर्यादा ५० हजार रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे.याशिवाय, योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या फेरीवाल्यांना यूपीआय-लिंक्ड रूपे क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे.त्याद्वारे पथविक्रेत्यांना अचानक उद्भवणाऱ्या व्यवसायिक व वैयक्तिक गरजांसाठी तात्काळ आर्थिक मदत मिळू शकेल.तसेच डिजिटल व्यवहारांवर रुपये १ हजार ६०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची सुविधाही आहे.या माध्यमातून फेरीवाले व लघुउद्योजकांना डिजिटल पद्धतीने व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्याकरीता तथा अधिक माहितीकरीता देसाईगंज नगर परिषदेच्या शहर अभियान व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा,असे आवाहन देसाईगंज नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!