- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-सावली तालुक्यातील अंतरगाव येथील श्रीकांत संगीडवार आणि पंकज कागदेलवार या दोघांना ब्रह्मपुरीच्या आमदारांनी बंगल्यावर बोलावून मारहाण केली,अशा आशयाची बनावट माहिती युवामंच आवळगाव या व्हॉट्सअप ग्रुपवर ब्रेकिंग न्यूज म्हणून पिंटू आंबोरकर यांनी व्हायरल केली होती. याप्रकरणी श्रीकांत संगीडवार यांनी काल मंगळवारी पाथरी पोलिस ठाण्यात पिंटू आंबोरकर याच्याविरोधात तक्रार दाखल केली असता अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
श्रीकांत संगीडवार यांच्या तक्रारीनुसार,श्रीकांत संगीडवार व पंकज कागदेलवार या दोघांना ब्रम्हपुरीच्या आमदारांनी बंगल्यावर बोलावून मारहाण केली,अशी माहिती युवामंच आवळगाव या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पिंटू आंबोरकर यांनी ब्रेकिंग न्यूज म्हणून टाकली आहे व ती व्हायरल होत असल्याची माहिती मित्र नितीन पाल (रा.व्याहाड) यांनी फोनद्वारे दिली.त्यांनी याचा स्क्रिन शॉट देखील पाठवला.असा कुठलाही प्रकार घडलाच नव्हता.तरी देखील आपल्या नावाने असा अपप्रचार करण्यात येत असल्याने श्रीकांत संगीडवार यांनी पाथरी पोलिस ठाण्यात धाव घेत पिंटू आंबोरकर याचेविरुद्ध तक्रार केली.विद्यमान आमदारांना बदनाम करण्याच्या हेतूने असा मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी केली आहे.
- Advertisement -