Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीविद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करणाऱ्या शिक्षकास अटक... - आरमोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक...

विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करणाऱ्या शिक्षकास अटक… – आरमोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिक्षक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-‘शिक्षण हे वाघणीचे दूध आहे; ते प्राशन केल्याने गुर गुरल्याशिवय राहणार नाही’ असे आपण नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमात ऐकत असतो.मात्र,शिक्षण घेत असतांना ज्या गुरूवर्यांवर आपण विश्वास ठेवतो व ज्ञानार्जनाचे धडे गिरवितो,अशा शिक्षकांकडून असभ्य वर्तन केले जात असेल तर त्याला काय म्हणावे?याबात तात्काळ योग्य पाऊल उचलणे आवश्यक असते.शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहराच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उघडकीस आली आहे. त्याबाबत शाळेतील मुलींना वाईट स्पर्श करणाऱ्या आरमोरी येथील सीताबर्डी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिक्षक चंद्रभान बांबोळे वय ५० वर्षे याला आरमोरी पोलिसांनी सोमवार दिनांक-२८ ऑक्टोंबर रोजी अटक केली आहे.शिक्षकी पेशाला कलंक लावणाऱ्या  शिक्षकाला कडक शिक्षा द्यावी; अशी मागणी पालकांनी केली आहे.
चंद्रभान बांबोळे हा चौथ्या वर्गाचा वर्गशिक्षक आहे. मुलींच्या खांद्यावर हात ठेवणे,कमरेत हात घालणे, मुलींच्या खांद्यावर स्वतःचे डोके ठेवणे,खाऊ देऊन मुलींची पप्पी घेणे; अशा प्रकारचे असभ्य वर्तन वर्गातच करीत होता.त्याचे हे वर्तन बघून काही मुली दुसऱ्या वर्गामध्ये जाऊन बसत होत्या.याबाबतची माहिती शाळेतीलच एका शिक्षकाने पालकाला दिली. त्यानंतर पालकाने मुलींकडे शहानिशा केली.तेव्हा बाब सत्य असल्याचे दिसून आले.एका पालकाने याबाबतची तक्रार आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली.पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक चंद्रभान बांबोळे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४ सहकलम १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.अधिक तपास आरमोरी पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!