Wednesday, July 22, 2026
Homeदेसाईगंजवादळी पावसाने छत हिरावलेल्या कुटुंबीयांना छगन शेडमाकेंनी दिला मदतीचा हात…

वादळी पावसाने छत हिरावलेल्या कुटुंबीयांना छगन शेडमाकेंनी दिला मदतीचा हात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंजतालुक्यातील अनेक गावांत दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने अनेकांच्या डोक्यावरील छत हिरावले.अशातच देसाईगंज तालुक्याच्या चिखली(रिठ)येथील अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या विनोद विठ्ठल दुमाने या गरीब कुटुंबीयाचे आलेल्या वादळी पावसाने छत हिरावून घरावरील संपुर्ण कवेलु उडाल्याने दुमाने कुटुंबियांना रात्र काढण्यासाठी दुसऱ्याच्या घराचा आधार घ्यावा लागला.याबाबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कामगार कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाके यांच्या निदर्शनास सदरची बाब येताच त्यांनी मोका चौकशी करून अस्मानी संकटात सापडलेल्या व अतिशय हलाखीचे जीवन जगत असलेल्या कुटंबियांच्या डोक्यावरील छत टाकुन देत कुटुंबीयांना ‘एक हात मदतीचा’ दिला असल्याने परिसरात शेडमाके यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव,पिंपळगाव,चिखली (रिठ)या परिसरातील घरांना वादळी वाऱ्यासह पावसाचा जबर तडाखा बसल्याचे निदर्शनास येताच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या गावांकडे धाव घेऊन मोका चौकशी केली; मात्र ठोस उपाययोजनेवर भर दिला नसल्याने राहायचे कुठे?असा गंभीर प्रश्न दुमाने कुटुंबीयांसमोर उभा ठाकला होता.

दरम्यान देसाईगंज तहसील कार्यालयाच्या वतिने मोका चौकशी करून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.मात्र दुमाने कुटुंबियांना पर्यायी व्यवस्था होईस्तोवर दुसऱ्याच्या घराचा आधार घेऊन राहावे लागेल,ही बाब गडचिरोली जिल्हा काँग्रेस कामगार कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाके यांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळ गाठून मोका चौकशी केली. चौकशीत सदर कुटुंब अतिशय हलाखीचे जीवन जगत असल्याचे निदर्शनास येताच शेडमाके यांनी तात्काळ घरावर छत टाकुन देण्याची संपुर्ण व्यवस्था करून दिली.यामुळे शेडमाके परिसरात एकच चर्चेचा विषय ठरू लागले असुन नैसर्गिक आपत्तीत मदतीला धावून आल्याने भारावलेल्या कुटुंबियांनी शेडमाके यांचे आभार व्यक्त केले.यावेळी विनोद दुमाने,वत्सलाबाई पर्वते,बळीराम बादशाह,भुमेश शिंगाडे,हरिदास बगमारे,अजय मेश्राम आदी चिखली येथील नागरिक उपस्थित होते.

यापूर्वीही अनेकांना केली मदत👇

कुठलाही राजकीय वारसा लाभला नसलेले छगन शेडमाके सामाजिक बांधिलकी जोपासण्यात सदैव अग्रेसर राहात असुन त्यांनी यापुर्वी अनेकांना नगद रोख रक्कम आर्थिक मदत देऊन नैसर्गिक संकटात धाऊन जाण्यात मौलिक भुमिका बजावली आहे. समाज व्यवस्था बळकट करण्यात काँग्रेसच सक्षम असल्याचा ठाम विश्वास असल्याने पक्षाची विचारधारा सोबतीला घेऊन शेडमाके आपली जबाबदारी ओळखून अनेकांना मदतीचा हात देत आहेत.त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात; पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६' अंतर्गत आज,बुधवार २२ जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनाचे तसेच मुख्यमंत्री...

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,बुधवार २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण...

उद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलन प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे.विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद...

देसाईगंजच्या शंकरपुर परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद; तर २० महसुल मंडळात मुसळधार पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल मंगळवारपासून ते आज बुधवार सकाळपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली.अजूनही पाऊस सुरूच आहे.२४ तासात जिल्ह्यात सरासरी ५१.४ मिमी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!