Tuesday, July 21, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा सती नदीच्या पुलाचे बांधकाम संथगतीने-पावसाळ्यात ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाशी तुटणार संपर्क…-सामाजिक कार्यकर्ते...

कुरखेडा सती नदीच्या पुलाचे बांधकाम संथगतीने-पावसाळ्यात ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाशी तुटणार संपर्क…-सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम यांनी बांधकामाची केली पाहणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :- कुरखेडा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या सती नदीवरील जुना पुल ठेंगणा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात महापूर येऊन अनेक गावांचा तसेच ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटून सदर मार्गावरील वाहतूक नेहमी ठप्प व्हायची; यासाठी मालेवाडा,कढोली पूराडा सह कूरखेडा-कोरची या राज्य महामार्गाला जोडणाऱ्या सतीनदीच्या जुन्या ठेंगण्या पुलाला तोडून नविन पूलाचे बांधकाम सूरू करण्यात आले आहे. मात्र,गेली सहा महिन्यांपासून नविन पूलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने परत पुनश्च तीच अवस्था निर्माण होऊन पावसाळ्यात सदर मार्गावरील वाहतूक ठप्प पडून ग्रामस्थांचा तालुका मूख्यालयाशी संपर्क तुटणार आहे.त्यामुळे अशी अवस्था निर्माण होऊ नये; याकरीता नवीन पुलाचे बांधकामाला यूद्ध स्तरावर गती प्रदान करण्याची व नागरिकांना दिलासा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम यांनी केली आहे.

कुरखेडा जवळून वाहणाऱ्या सती नदीवरील जुन्या पुलाला तोडून नविन पूलाचे बांधकाम मागील ६ महिण्यापूर्वी सूरू करण्यात आले आहे.मात्र,संबंधित विभाग व कंत्राटदाराच्या नियोजनशून्य रणनीतीमुळे सदर बांधकामाला गती मिळेनाशी झाली आहे.मागील काही महिन्यांपूर्वी तांत्रिक अडचणीमूळे अनेक दिवस बांधकाम ठप्प ठेवण्यात आले होते.सध्याच्या घडीला पुलाच्या बाजूने कच्चा रपटा तयार करून याठीकानाहून वाहतूक सूरू आहे.मात्र,पावसाळ्यात हा रपटा पूराच्या पाण्याने तग धरू शकणार नाही व या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे.या मार्गावरील वाहतूक बंद पडल्यास सतीनदीच्या पलीकडील तालूक्यातील अनेक गावांचा संपर्क तालुका मूख्यालयाशी तूटणार आहे;विद्यार्थ्यांना तालुका मूख्यालयात असलेल्या शाळा तसेच महाविद्यालयात ये-जा करण्यास कठीण होणार आहे. तसेच परिसरातील ग्रामस्थांना बाजारपेठ व कार्यालयीन कामाकरीता संपर्क तूटल्याने मोठी अडचण निर्माण होणार आहे; याच बरोबर सदर मार्गावरील बस,वाहतूक सूद्धा ठप्प पडणार आहे. पर्यायी मार्ग जरी तयार करण्यात आला असला तरी सदर मार्ग लांब अंतराचा व अरूंद असल्याने मार्गाने जड वाहतूक शक्य होणार नाही; त्यामूळे कोरची व पुढे देवरी तसेच छत्तीसगढ़ कडे जाणारी वाहतूक सूद्धा ठप्प पडणार असल्याने संबंधित विभागाने नवीन पुलाच्या बांधकामाला गती देत,यूद्ध स्तरावर बांधकाम करावे व संभाव्य उद्भवणाऱ्या परीस्थीतून तालूका वासियांना दिलासा द्यावा; अशी मागणी बांधकाम स्थळाला भेट देणारे सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम,कुरखेडा तालुका कांग्रेसचे अध्यक्ष तथा माजी जि.प.उपाध्यक्ष जिवन पाटील नाट, देसाईगंजचे माजी पं.स.सभापती परसराम टिकले,कुरखेडा यूवक कांग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीधर तितराम यांनी केली आहे.शिष्ट मंडळाने भेट देत पाहणी केली असता मोजक्याच मजूरांकडून संथगतीने बांधकाम सूरू असल्याचे निदर्शनास आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!