उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर (सिंदेवही) :-वाघ आणि बिबट्याच्या झुंजीत बिबट्या ठार झाल्याची घटना आज मंगळवारी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मरेगाव क्षेत्रातील कक्ष क्रमांक २७६ खैरी,पवनपार पासून एक किलोमीटर अंतरावर उघडकीस आली.सदर घटना सोमवारी रात्री घडली.घटनेची माहिती कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व प्रकरणाची शहानिशा केली असता पट्टेदार वाघ आणि बिबट्यामध्ये जोरदार झुंज झाली.यामध्ये बिबट्याचा जागीच मुत्यू झाल्याची प्रथम दर्शनी माहिती मिळाली. सहाय्य्क उपवनसंरक्षक चोपडे,वनपरीक्षेत्र अधिकारी सालकर,क्षेत्रसहाय्यक बुरांडे,वनरक्षक व्ही.बी.सोरते, वनरक्षक सोरते,वनरक्षक येरमे व वनरक्षक राठोड यांच्या उपस्थितीत पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.