Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीसावधान....! चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याच्या नावाने दागिने लुटणारी टोळी सक्रिय...

सावधान….! चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याच्या नावाने दागिने लुटणारी टोळी सक्रिय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- सोने-चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे.दुपारच्या वेळी शहरी व ग्रामीण भागांत जाऊन वयोवृद्ध व महिलांना ‘टार्गेट’ करण्यावर  टोळीचा भर असतो.सोने- चांदीचे दागिने चमकविण्याचा दावा करून टोळीतील लोक ‘हातचलाखी’ करून लाखो रुपयांचे दागिने लंपास करीत असतात.

संबंधित टोळीचे सदस्य एखाद्या पावडर कंपनीचे नाव सांगून घरात प्रवेश करतात.साधारणतः दुपारच्या सुमारासच हे लोक येतात.विशेषत: ज्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा महिलाच असतात अशी ठिकाणे शोधून टार्गेट करीत असतात.अगोदर भांडी चमकवून देण्याचा दावा करीत ‘डेमो’ देतात.यादरम्यान त्यांच्याजवळील ‘केमिकल व खऱ्या पावडरचा उपयोग करून ते खरोखर संबंधित भांडी चमकवून देतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचादेखील विश्वास बसतो. त्यानंतर हे लोक एखादे चांदीचे लहानसे भांडे मागतात व त्यालादेखील काही वेळात डोळ्यासमोर चमकवून देतात.साहजिकच समोरील व्यक्तीचा विश्वास आणखी वाढतो व त्यानंतर सोने-चांदीचे दागिनेदेखील त्यांना देण्यात येतात.येथूनच टोळीचा खरा खेळ सुरू होतो.लाल रंगाची पावडर पाण्यात टाकून ते मिश्रण तयार करतात व त्यात दागिने टाकतात.त्यानंतर एखाद्या डब्यात किंवा भांड्यात ते पाणी व दागिने टाकून ते गॅसवर गरम करायला सांगतात व पाच मिनिटांनी दागिने पाण्यातून बाहेर काढण्याची सूचना करतात.समोरील व्यक्ती त्यात व्यस्त असतांना हे लोक घरातून काढता पाय घेतात.पाच मिनिटांनंतरच आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येते.मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो.

उजाला’, ‘पतंजली’चे प्रतिनिधी असल्याचा करतात दावा

अगोदर हे आरोपी संबंधित भागाची रेकी करतात.दुपारची वेळ पाहून घरासमोर जाऊन आवाज देतात किंवा बेल वाजवितात, ‘उजाला’ किंवा ‘पतंजली’ या कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात.सर्व्हे सुरु असल्याचे सांगत मोफत भांडे चमकवून देण्याची बतावणी करीत असल्याने; अशांपासून सावध रहावे.

सोने-चांदी -पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी ‘पॉलिश  ‘गँग’ नागपुरात सक्रिय झाली आहे.आपल्याही परिसरात केव्हाही दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशांपासून सतर्कता बाळगावी.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!