- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ
आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही जीव घेऊ पाहत असल्याने “इकडे आड अन् तिकडे विहीर” अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.शेतातील कामात व्यस्त असतांनाच एका पट्टेदार वाघाने ६५ वर्षीय शेतकऱ्यावर अचानकपणे हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास गिरगाव शेत शिवारात घडली.देवाजी पांडुरंग वाढई वय ६५ वर्षे, रा.गिरगाव,ता.नागभीड,जि. चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी देवाजी वाढई हे बुधवारच्या सकाळी शेतावर गेले होते.दरम्यान,शेतातील धूऱ्यावरील गवत कापत असतांनाच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला चढवला.अचानक झालेल्या हल्ल्याने देवाजी यांनी आरडाओरड केली. त्याचवेळेस जवळच्याच शेतात धान कापणी करणाऱ्या महिला जोरजोरात ओरडू लागल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला.यामुळे मोठा अनर्थ टळला.मात्र,घडलेल्या या चित्तथरारक घटनेने उपस्थितांच्या मनात धडकी भरली.हल्ल्यात देवाजी वाढई हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
- Advertisement -

