Tuesday, July 21, 2026
Homeपुणेवर्गमित्राकडून शारीरीक,मानसिक त्रास; इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या.. - व्हॉईस...

वर्गमित्राकडून शारीरीक,मानसिक त्रास; इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या.. – व्हॉईस मॅसेज व रेकॉर्डिंगवरून उलगडा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीने वर्गमित्राकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील ताथवडे येठे उघडकीस आली आहे. प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली; मात्र, विद्यार्थिनीने व्हॉईस मॅसेज व रेकॉर्डिंगवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा उलगडा होताच एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.सहिती कलुगोटाला रेड्डी वय २० वर्षे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.तर प्रणव राजेंद्र डोंगरे वय २० वर्षे असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव आहे.
सहिती रेड्डी ही आकुर्डी येथील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती.तिने १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली.पण तिने आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलमध्ये अनेक व्हॉईस मॅसेज व रेकॉर्डिंग करून ठेवले होते.हे मॅसेज व रेकॉर्डिंगचे पुरावे तिने आपल्या काही मित्रांना फॉरवर्ड करत आपला मोबाईल कुठे ठेवला आहे,त्याचे ठिकाण व त्याचा पासवर्डही सांगितला होता.तिच्या मित्र-मैत्रिणींनी हा सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला.प्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी वय ५४ वर्षे यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली.त्यानंतर पोलिसांनी हा मोबाईल हस्तगत केला असता सहितीच्या आत्महत्येचे खरे कारण समोर आले.आरोपी प्रणव डोंगरे हा सहितीस शारीरीक व मानसिक त्रास देत होता,असे सहितीने आपल्या रेकॉर्डिंगमध्ये म्हटले होते.
त्यानुसार पोलिसांनी प्रणव डोंगरे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत अटक केली.आरोपी प्रणव डोंगरे यास न्यायालयात हजर केले असता,न्यायलयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!