Tuesday, July 21, 2026
Homeमुंबईअखेर काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची हर्षवर्धन सपकाळांनी सूत्रे घेतली हाती..

अखेर काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची हर्षवर्धन सपकाळांनी सूत्रे घेतली हाती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नुकतीच १३ फेब्रुवारीला काँग्रेसचे महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसकडून अधिकृतपणे प्रसिद्धीपत्रक जारी करुन याबाबत माहिती देण्यात आली होती.तत्पूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचे संबंधित पत्रकात म्हटले होते. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज,मंगळवार १८ फेब्रुवारीला मुंबईच्या टिळक भवन इथे काँग्रेस कमिटीच्या विविध नेते,पदाधिकारी तथा मान्यवरांच्या उपस्थितीत नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.प्रसंगी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक,माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विधी मंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार,माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. काँग्रेसमधील अनेक मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत असतांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठावान नेते आहेत. त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे २०१४ ते २०१९ या काळात बुलढाणा मतदारसंघाचे आमदार होते.तसेच ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.ते काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात.याशिवाय सपकाळ हे गांधी परिवाराचे जवळचे मानले जातात.त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी.पी.एड पदवी धारण केलेली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!