उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर(बल्लारपूर) :- बल्लारपूर येथील दीनदयाल वॉर्डातील रहिवासी जानकीदेवी लक्ष्मण मांझी यांच्या याचिकेवर ३१ ऑगस्टला बल्लारपूर न्यायालयाने सुनावणी केली. त्यांची सून व मुलाला वडिलांचे राहते घर खाली करून दर महिना चार हजार रुपये आई- वडिलांना देण्याचे आदेश दिले आहेत.
बल्लारपूर पेपर मिलमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर लक्ष्मण मांझी यांनी पंडित दीनदयाळ वॉर्डात घर विकत घेतले व पत्नी तसेच आपला मुलगा आणि सुनेसह राहू लागले; परंतु, काही दिवसानंतर मुलगा व सुनेने त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले.हा त्रास असहनीय झल्यानंतर जानकीदेवी मांझी यांनी महिला अधिनियमचे कलम १९ चे अंतर्गत ॲड. सुनील पुरी यांच्या माध्यमातून मुलगा जितेंद्र मांझी व सून मीना मांझी यांच्या विरोधात बल्लारपूर न्यायालयात याचिका दाखल केली.न्यायाधीश अनुपम एस.शर्मा यांनी निर्णय देताना मुलगा व सुनेला दोन महिन्यांच्या आत घर खाली करण्याचा आदेश दिला व मांझीचा मुलगा जितेंद्र याला दर महिना चार हजार गुजराण भत्ता देण्याचे आदेश दिले.मुलगा व सून यांना त्यांच्या घरी न जाण्याचे आदेश दिले.वयोवृद्ध जानकीदेवी यांची पैरवी ॲड.सुनील पुरी यांनी केली.