- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधुन आज,शनिवार १० मे रोजी गडचिरोली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने
स्वाभिमाण दिन कार्यक्रम आयोजित करून देसाईगंज ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप तसेच फराळ वाटप करण्यात आले.
स्वाभिमाण दिन कार्यक्रम प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम म्हणाले की,वंचित बहुजन आघाडी ही शोषित,वंचित तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी असून बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला प्रेरित आहे.आजचे राजकारण हे ‘ताकापुरते रामायण’ असे झाले आहे.मात्र,वंचित बहुजन आघाडी ही सत्तेत असो वा नसो समाजकार्यात नेहमी तत्पर असणार,असे मत व्यक्त केले.
प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भिमराव शेन्डे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रद्न्याताई निमगडे,तालुकाध्यक्ष विनोद मेश्राम,भाग्यवान बन्सोड,इंजि.प्रमोद मेश्राम,से.नि.पो. नि.नानाजी कऱ्हाडे,शिवदास बन्सोड,शिशुपाल वालदे, राकेश शेन्डे,दिलिप बन्सोड,सुमित मेश्राम,सौरभ बावणे,मनोज घायवान यांचेसह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.ईकबाल बेग,डॉ.गौरव सुंदरकर, रेखा चंदावार,वैद्यकिय कर्मचारी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -

