Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीराष्ट्रीय लोकअदालतीत ९७ लाख ५२ हजाराची वसुली.. - एकत्र नांदायला तयार झालेल्या...

राष्ट्रीय लोकअदालतीत ९७ लाख ५२ हजाराची वसुली.. – एकत्र नांदायला तयार झालेल्या जोडप्यास साडी-चोळी व शेला देऊन सत्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या आदेशानुसार व मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा व तालुका न्यायालयात आज,शनिवार १० मे ला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीत एकूण १० पॅनलच्या माध्यमातून प्रलंबित व दाखलपूर्व अशा एकूण १२२ प्रकरणांमध्ये तडजोड साधण्यात आली.या लोकअदालतीत एकूण ९७ लाख ५२ हजार ४९१ रुपये रकमेची वसुली करण्यात आली.
फौजदारी तडजोड प्रकरणे,धनादेश कायद्याखालील कलम १३८ अन्वयेची प्रकरणे,कौटुंबिक वाद,मोटार अपघात दावा,कर्जवसुली,वीजबिल थकबाकी, ग्रामपंचायतींची घरपट्टी-पाणीपट्टी,ग्राहक न्यायालयातील तक्रारी आणि वाहन चालान अशा विविध स्वरूपातील प्रकरणांचा यात समावेश होता.  किरकोळ गुन्ह्यांपैकी ५४ प्रकरणे गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्यात आली.पॅनल क्रमांक-२ मध्ये एक वैवाहिक प्रकरण आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आले.पती-पत्नी एकत्र नांदायला तयार झाल्याने त्यांचा साडी-चोळी व शेला देऊन सत्कार करण्यात आला.सदर लोकअदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी व सचिव न्या.आर.आर. पाटील यांच्या देखरेख खाली करण्यात आले.पॅनल क्रमांक-१ चे कामकाज पी.आर.सित्रे यांनी,पॅनल क्रमांक-२ चे एस.पी.सदाफळे यांनी आणि पॅनल क्रमांक-३ चे एस.बी.विजयकर यांनी पाहिले.किरकोळ गुन्ह्यांची सुनावणी व्ही.आर.मालोदे यांच्या न्यायालयात पार पडली.पॅनल सदस्य म्हणून मनोहर हेपट,देवाजी बावने आणि अर्चना चुधरी यांनी सहभाग घेतला. गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष किशोर आखाडे,ज्येष्ठ अधिवक्ते,संपूर्ण अधिवक्ता वर्ग, न्यायालयीन कर्मचारी आणि विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लोकअदालतीसाठी महत्त्वाचे योगदान दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!