Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरलिपिकाकडे आर्थिक कारभार; खोट्या स्वाक्षऱ्या करून ३४ लाखावर डल्ला..!

लिपिकाकडे आर्थिक कारभार; खोट्या स्वाक्षऱ्या करून ३४ लाखावर डल्ला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकाकडे आर्थिक कारभार सांभाळण्याची जबाबदारी दिल्यानंतर त्याने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खोट्या स्वाक्षरी व बनावट कागदपत्राचा वापर करून  चार वर्षाच्या कार्यकाळात जवळपास ३४ लाख ११ हजार रुपयांचा भ्रष्टाचार करून ही रक्कम आपल्या खात्यात वळती केली.सदरचा प्रकार उघडकीस येताच वैद्यकीय अधीक्षक मनीष सिंग यांच्या तक्रारीवरून कनिष्ठ लिपिक अतुल गणेश सारसर वय ३६ वर्षे, रा.श्रीरामनगर,भद्रावती याला पोलिसांनी अटक केली आहे.
कनिष्ठ लिपिक अतुल सारसर हा २०१९ मध्ये भद्रावती ग्रामीण रुग्णालय येथे रुजू झाला.त्यानंतर त्याच्याकडे ग्रामीण रुग्णालयाच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी आली. २०२१ पासून त्याने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून धनादेशाचे वापर करणे,बँकेचे बनावट स्टॅम्प तयार करून चालान स्लीपवर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी करीत होता.विवाह नोंदणी प्रक्रिया तसेच इतर योजनांची रक्कम स्वतःच्या खात्यात वळती करत होता.वैद्यकीय अधीक्षक मनीष सिंग यांना या प्रकाराबाबत २२ जानेवारी २०२५ ला माहिती होताच त्यांनी सर्वप्रथम जिल्हा शल्य चिकित्सक यांना या प्रकाराबाबत माहिती दिली. यानंतर अहवाल आरोग्य विभाग नागपूर यांनाही देण्यात आला.त्यानंतर चौकशी कमिटी नेमण्यात आली.यात अतुल सारसर याने ३४ लाख ११ हजार इतक्या शासकीय रकमेचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले.२१ एप्रिलला वैद्यकीय अधीक्षक यांनी या प्रकाराबाबत भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार भद्रावती पोलिसांनी अतुल सारसर यास अटक केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!