Saturday, September 5, 2026
Homeभंडारालाच देण्याची इच्छा नसतांनाही मागितली लाच; १५ हजारासाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात..!

लाच देण्याची इच्छा नसतांनाही मागितली लाच; १५ हजारासाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसतांनाही पैश्याची लालच सुटलेल्या एका ४२ वर्षीय लाचखोरास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केल्याची घटना आज, गुरुवार १६ ऑक्टोंबर रोजी भंडाऱ्याच्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातील कार्यालयात घडली. रत्नघोष ऋषीजी हुमणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,भंडारा येथे कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होता.३६ वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या लाभार्थी असून,त्यांना घरे बांधकामासाठी १९ लाख ५० हजार रुपये कर्जाची
काँक्रीट मिक्सर मशीन मंजूर झाली होती.त्यातील ३५ टक्के रक्कम,७ लाख रुपये ही सबसिडी होती. सबसिडीची रक्कम लवकरात लवकर जमा व्हावी, यासाठी आवश्यक कागदपत्रे कार्यालयाच्या माध्यमातून व्यवस्थित अपलोड करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी हुमणे याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी काल बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे तक्रार दिली होती.त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल,बुधवार १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली. पडताळणीत आरोपी हुमणे याने तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि त्याचा पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.त्यानुसार,आज,गुरुवारी आरोपीच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला.रत्नघोष हुमणे याने तक्रारदाराचे काम करून देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली.लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडून लाचेची रक्कम आणि एक मोबाईल जप्त केला.प्रकरणी आरोपीविरुद्ध भंडारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!