उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील केळझर गावातील रहिवासी असलेल्या हर्षल नांनावरे तरुणाने वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याच्या त्रासापायी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच फोन लावून टाकला.
मुसळधार पावसामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.त्यानुसार लाईट ये-जा करीत असल्याने विद्युत वितरण कंपनीमध्ये आपबिती सांगूनही वीज पुरवठ्याच्या समस्येतून मार्ग निघू न शकल्याने हर्षल नांनावरे युवकाने थेट मुख्यमंत्री यांचा फोन नंबर मिळवला व हिंमत दाखवत सरळ फोन लावला असता मुख्यमंत्री यांचे विशेष कार्याधिकाऱ्यांनी फोन उचलून समस्या ऐकून घेतली.महत्वाचे म्हणजे हर्षल वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्रासून गेला होता. त्यानुसार त्याने सांगितले की,सुरुवातील दोन तास लाईट गेली.समस्या ऐकताच विशेष कार्याधिकारी अचंभित झाले व त्यांनी किमान दोनच तास लाईट गेली म्हणून थेट मुख्यमंत्री यांना फोन लावता काय?असे म्हणून हर्षलची समजूत काढली.