Sunday, September 20, 2026
Homeवर्धापट्टेदार वाघाचा पाण्यात आढळला मृतदेह..

पट्टेदार वाघाचा पाण्यात आढळला मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-एका पट्टेदार वाघाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुडपाड परिसरातील मोठा नहराच्या (कॅनल)पाण्यात उघडकीस आली.सकाळच्या सुमारास शेतशिवारात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना वाघ पाण्यावर तरंगताना दिसून आला.कॅनलमध्ये पाण्यात तरंगत असलेला वाघाचा मृतदेह पाहून शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली.माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.मृत वाघाचा परिसर सील करून पंचनामा करण्यात आला.प्राथमिक पाहणीत वाघाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या बाह्य जखमा आढळून न आल्याने वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,हे अद्याप स्पष्ट झाले नाही.त्यामुळे वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला की शिकार अथवा विजेचा धक्का, विषबाधा किंवा अन्य कारणामुळे मृत्यू झाला,याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू केली असून शवविच्छेदन अहवालानंतरच वाघाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

उद्याला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाची खरीप शिवार फेरी.. – एकाच ठिकाणी २२८ पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशींची प्रात्यक्षिके व शास्त्रज्ञांशी थेट संवादाची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!