- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- ‘रेती चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला’ अश्या कथानक रेती तस्कर रंगवू लागले आहेत.रात्र असो की दिवस,चोरांसाठी सारखेच असतात. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यात दोन दिवसांपूर्वीच्या रात्री म्हणजेच शनिवारी खतरनाकच घटना दबक्या आवाजात उघडकीस आली आहे रात्रीच्या सुमारास चोरट्यांकडून अवैध रेतीचा उपसा करीत असतांना अचानकपणे डरकाळी फोडून वाघ धावला असता मजुरांनी वेळीच प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरच्या ट्रालीत उडी घेतल्याने सर्व मजूर थोडक्यात बचावले.सदरची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास चिमूर तालुक्याच्या पळसगाव वन परीक्षेत्रातील बफरच्या जंगल परिसरातील नदी घाटवर घडली. अवैद्य रेतीतस्करीचे ट्रॅक्टर असल्याने याची वाच्यता कुठेही झाली नसली तरीही याची कानकुण सर्वत्र परिसरात सुरू झाली आहे.अशातच वाघाच्या हल्ल्याने रेती उपसा करण्याकरीता मजूर मिळेनासे झाले आहेत.चिमूर तालुक्यात रेतीतस्करी करण्यासाठी वनविभाग आणि पोलिस,महसूल प्रशासनाने सर्व शासकीय नियम पायदळी तुडवत रेतीतस्करांसाठी मोकळे राण करून दिले आहे. म्हणून दिवसरात्र रेतीचा उपसा होत असतानाही वनविभाग,महसूल व पोलिस यंत्रणा रेती तस्करांसमोर हतबल झाली आहे.परिणामी शासनाचा करोडो रुपयांच्या महसूल बुडत आहे.
- Advertisement -