Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूररुग्णाने शौचालयातच घेतला गळफास..

रुग्णाने शौचालयातच घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- शहरातील बाबूपेठ व्यसनमुक्ती केंद्रात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णाने शौचालयात लुंगीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास उघडकीस आली.सचिन जनार्धन शिगरपवार वय ४२ वर्षे हल्ली मुक्काम नेरी,मूळ गाव तेलंगणा असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे.

सचिन आपल्या कुटुंबासह रोजगाराच्या शोधात नेरी येथे वास्तव्यास आला होता.त्याला दारूचे व्यसन असल्याने कुटुंबियांनी त्याला दारु सोडण्यासाठी चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील झेप व्यसनमुक्ती केंद्रात मागील काही दिवसांपूर्वी दाखल केले होते. मात्र,तो मानसिक विवंचनेत होता.यातूनच त्याने काल, सोमवारी लुंगीने शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनेची माहिती रामनगर पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मर्ग दाखल केला. प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू बलगेवार यांनी केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!