Thursday, April 30, 2026
Homeदेसाईगंजआरमोरी विधानसभा क्षेत्राच्या रणसंग्रामाची मोर्चेबांधणी सुरु…-भाजप कडुन कृष्णा गजबे तर कॉंग्रेस कडुन...

आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या रणसंग्रामाची मोर्चेबांधणी सुरु…-भाजप कडुन कृष्णा गजबे तर कॉंग्रेस कडुन रामदास मसराम सह अनेकांचे प्रयत्न सुरु…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

राजरतन मेश्राम/उपसंपादक

देसाईगंज(गडचिरोली) :- आरमोरी विधानसभा निवडणुकीचे रणसंग्राम आता अगदी जवळ आले असुन ऑगष्ट महिण्याच्या शेवट-शेवट आचारसंहितेचे बिगुल वाजणार असल्याने आता हळुहळु इच्छुक उमेदवारांनी आपली प्रबळ दावेदारी सिद्ध करण्यासाठी हालचाली सुरु केल्या असल्याचे हल्ली चित्र सर्वत्र दिसून येत आहेत.अशातच आता भाजप व महायुतीकडुन विद्यमान आमदार कृष्णा गजबे तर कॉंग्रेस व महाविकास आघाडी तर्फे रामदास मसराम यांचेसह माजी आमदार आनंदराव गेडाम,कॉंग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष छगन सेडमाके,किसान आघाडीचे वामनराव सावसाकडे यांचेसह इतर इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारीची दावेदारी सिद्ध करण्यासाठी कसोसीने प्रयत्न सुरु केले आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला शिवसेना उबाठा गट कोणती भुमिका घेते यावरही येत्या निवडनुकिचे चित्र अवलंबुन असले तरी मुख्य लढत मात्र भाजपचे उमेदवार कृष्णा गजबे आणि कॉंग्रेसचे रामदास मसराम यांच्यातच होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.अशातच आनंदराव गेडाम यांनीही आपल्या उमेदवारी साठी हालचाली सुरु केल्या  असल्याचे दिसुन येत आहे.                  लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला अपेक्षे पेक्षा जास्त यश मिळाले आहे.त्यातच विधानसभा निवडणुकीत हे यश टिकवुन ठेवण्यासाठी तसेच विधानसभेत प्रभाव निर्माण करण्यासाठी तिकिट मिळविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये चुरस निर्माण करुन कॉंग्रेस पक्षाचा प्रचार घराघरापर्यंत करुन सर्वात प्रभावी कोण? याची चाचपणी करुणच तिकिट वाटपचा निर्णय घेतला जाणार आहे.पक्षाची तिकिट मिळावी यासाठी भाऊगर्दी करणारे सर्वच संभाव्य उमेदवार तन,मन धनाने कामाला लागले असले तरी यात रामदास मसराम,आनंदराव गेडाम व छगन सडमाके यांनी आपला जनसंपर्क वाढविला असल्याने कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते काय सुचना देतात; याकडे वामनराव सावसाकडे लक्ष देऊन आहेत.या नावानंतरही नविन इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणात होणार असुन शिवसेना उबाठा गट महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी यावेळी आरमोरी विधानसभेची दावेदारी मिळावी; यासाठी दबावगट तयार करतांना दिसत आहे.असे असले तरी गेल्या २ वर्षापासुन कॉंग्रेस पक्षासाठी सातत्याने काम करणारे आरमोरी विधानसभा क्षेत्रात भुमीपुत्र म्हणून ओळख निर्माण करणारे शेतकरी आंदोलनाचे प्रणेते रामदास मसराम

 हे इतर उमेदवारांच्या तुलनेत कितितरी पटीने पुढे असुन त्यांनी जिल्हा परिषद शिक्षकाच्या नोकरीचा राजिनामा देऊन पुर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवत कॉंग्रेसच्या सर्वच कार्यक्रमात सक्रिय सहभागी होऊन तन मन धनाने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा सपाटा सुरु केला आहे. गोर गरीब जनतेची कळकळ लक्षात घेता,आरोग्य शिबिरीचे आयोजन करणे,शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे,सर्वसामान्य नागरिकांची कामे करणे व इतर असे अनेक उपक्रमे सुरु केली आहेत.तसेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आपली ओळख निर्माण करुन एक प्रकारचे आव्हान उभे केले आहे.तर ‘गरज जिथे आम्ही’ ही भुमिका घेत आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष छगन सडमाके यांनीही गरजुंना साड्या वाटप करणे, विद्यार्थ्यांना नोटबुक वह्या,पुस्तके,ताळपत्री तसेच आर्थिक मदत देऊन आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण करुन पक्ष जर तिकिट देत असेल तरच आपण निवडणूक लढणार; अशी भुमिका घेतली आहे.

या निवडणुकीवर प्रभाव पाडण्याची क्षमता असलेले आनंदराव गेडाम हे दोन टर्म आमदार राहिले असुन दोन टर्म त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असतांना पाचव्यांदा तिकिट मिळावी यासाठी प्रयत्नरत आहेत.तर अतिशय सावध पवित्रा घेत वामनराव सावसाकडे पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाची प्रतिक्षा करतांना दिसत आहेत.

कृष्णा गजबे यांची बाजु अजुनही भक्कमच

सलग दोन टर्म आनंदराव गेडाम यांचा पराभव करीत आमदार बनलेले कृष्णा गजबे यांचा शांत व मृदुभाषी स्वभाव जनसामान्यात आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला असुन १० वर्षाच्या आमदारकीच्या काळात अनेक विकासकामे करीत सर्वच सामाजिक,धार्मीक कार्यात सहभागी होणे,लग्न समारंभ,मय्यती,तेरव्या,बारसे,वाढदिवसे यांत उपस्थित राहुन पारिवारिक संबंध अत्यंत दृढ निर्माण करुन सहज उपलब्ध होणारा आमदार म्हनुण ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार माजी खासदार अशोक नेते यांना खा.डॉ नामदेवराव किरसान यांचेपेक्षा लाखो मते कमी मिळाल्याने कॉंग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले तरी १० वर्षे खासदार असतांना विकासाकडे लक्ष न देणे, सहज उपलब्ध न होणे,कार्यकर्त्यांशी संवादाचा अभाव अशी अनेक कारणे नेते यांच्या पराभवाला कारणीभुत ठरली आहेत.

मृदभाषी कृष्णा गजबे यांच्या उमेदवारीला विजयात परिवर्तित करण्यासाठी अरविंद सावकार पोरेड्डीवार, किसन नागदेवे,प्रकाश सावकार पोरेड्डीवार,मोतीलाल कुकरेजा,राजु जेठानी,शालु दंडवते,रविंन्द्र गोटेफोडे, चांगदेव फाये,नाजुक पुराम यांचेसह विधानसभेतील शेकडो भाजपचे प्रभावी नेते व कार्यकर्ते असल्याने गजबे यांचा विजयरथ रोखने कॉंग्रेसला कठिण असले तरी आदिवासी समाजाचे परंपरागत कॉंग्रेस पक्षाचे गट्ठा मते व ओबिसी संघटनेच्या माध्यमातुन या समाजात आगळी-वेगळी ओळख निर्माण करणारे आणि शिक्षक संघटनेचा पाठिंबा असलेले रामदास मसराम हे आव्हान पेलु शकतात; असे कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांकडुन बोलले जात आहे.लोकसभा निवडणुकीत आरक्षण व संविधान हा आंबेडकरी समाजासाठी करा किंवा मरा असा मुद्दा असल्याने या समाजाने आपल्या जिव्हाळ्याचा पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टीला बगल देत गट्ठा मते कॉंग्रेसला दिल्याने डॉ.नामदेवराव किरसान यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.मात्र विधानसभा निवडणुकीत हा समाज कोणाच्या पाठिशी उभा राहतो; यावरही बरेच काही अवलंबुन आहे.

संपुर्ण विधान सभेत ५ हजाराचे जवळपास मतदार असलेल्या मुस्लिम समाजावरही आमदार कृष्णा गजबे यांची घट्ट पकड असुन ३५ हजारचे वर असलेल्या आंबेडकरी समाजात ही वैयक्तिक संबंधाचा प्रभाव असल्याने विजय खेचुन आणणे सोपे असले तरी रामदास मसराम यांचा स्वभावही मनमिळावु,मृदभाषी असल्याने आदिवासी समाज,ओबिसी समाज व मुस्लिमांसह आंबेडकरी समाजात ओळख असल्याने आव्हान पेलण्यात इतर उमेदवारांच्या तुलनेत सरस ठरतिल; असे असले तरी निवडणुकीच्या रणांगनात शेवटच्या क्षणापर्यंत काय बदल घडुन येईल; हे सध्यातरी सांगणे कठिण आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

पोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. – तरुणावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये एकमेकांविषयी आकर्षण वाढते आणि तिथूनच पुढे सुरू होतेय अनोखी 'लव्हस्टोरी' ही काही सांगण्याची गरज नाही.पण,अल्पवयीनांची 'लव्हस्टोरी' चिरकाल टिकणारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!