Friday, June 19, 2026
Homeनंदुरबारअन् भररस्त्यात ओसाड डोंगरावर महिलेची झोळीतच झाली प्रसूती….

अन् भररस्त्यात ओसाड डोंगरावर महिलेची झोळीतच झाली प्रसूती….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नंदुरबार :- एका गर्भवती महिलेला रस्त्याअभावी बांबूच्या झोळीतून नेले जात असताना भररस्त्यात ओसाड डोंगरावर महिलेची झोळीतच प्रसूती झाल्याची घटना घडली आहे.धडगाव तालुक्यातील तेलखेडी या अतिदुर्गम गावातील या घटनेवरून लोकप्रतिनिधी टीकेचे लक्ष बनले आहेत.

आदिवासी दुर्गम भाग म्हटले की,रस्त्याअभावी डोंगरदऱ्यांतून पायपीट करीत बांबूच्या झोळीतून रुग्णांची ने-आण करण्याचे दृश्य नेहमीचेच आहे.मात्र, कोट्यवधी रुपयांच्या योजना खर्च करूनही अनेक गाव-पाडे रस्त्याविना असल्याने पावसाळ्यात या गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होते.अशाच तेलखेडी या अतिदुर्गम गावातील खुंटी पाड्यातील अर्चना पावरा या महिलेला प्रसूती कळा आल्याने तिला नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेणे आवश्यक होते.तथापि पावसामुळे या गावाचा संपर्क तुटला होता.तसेच कोणताही रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांनी बांबूची झोळी करून खांद्यावर पायपीट करीत अनेक किलोमीटर चालून तिला आणले.परंतु त्या महिलेचा त्रास वाढला आणि डोंगरदऱ्याच्या मार्गातच तिची प्रसूती झाली.

रुग्णालयाबाहेर होणाऱ्या प्रसूतीची संख्या कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न केले जातात. असे असले तरी अनेक गाव,पाड्यांवर रस्तेच नसल्याने तिथे ॲम्बुलन्स पोहोचत नाहीत.तसेच शहरापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने अशा घटना नेहमीच पुढे येतात मात्र, परिस्थिती बदलणार तरी कधी?अशी भावना या गाव-पाड्यावरील नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!