Monday, August 17, 2026
Homeचंद्रपूरयुवा तलाठ्याचा खोलीतच आढळला मृतदेह....

युवा तलाठ्याचा खोलीतच आढळला मृतदेह….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- गोंडपिपरी येथे भाड्याच्या घरात राहणारे तलाठी ओमकार भदाडे  वय २६ वर्ष हे काल शनिवारी २६ ऑगष्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.भदाडे हे पोंभुर्णा तालुक्यातील देशपांडे (पिपरी) येथे कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील रहिवासी ओमकार भदाडे हे सकाळी मित्रांसोबत व्यायाम शाळेत जावून परत आल्यावर ढाबा पॉइंट चौक येथील बालू चिंतावार यांच्या भाड्याच्या खोलीत गेले.दरम्यान, शेजारच्या व्यक्तीने जेवायला आवाज दिला.मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे पोलिस व मित्रांच्या सहकार्याने खोलीचा दरवाजा तोडून बघितले असता,ते मृतावस्थेत आढळले.तीन दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत असल्याचे तलाठी सूरज राठोड यांना सांगितले होते. उपचारासाठी आग्रह सुद्धा केला.त्यांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा असल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल,अशी माहिती ठाणेदार जीवन राजगुरू यांनी दिली.युवा तलाठी ओमकार भदाडे यांच्या अकाली मृत्यूने महसूल प्रशासनातर्फे हळहळ व्यक्त केले जातआहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!