- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालयात तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन ‘युवा स्पंदन’ मोठ्या उत्साहात नुकतेच पार पडले असून सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला होता.प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने विविध मैदानी व इनडोअर खेळांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये क्रिकेट, कबड्डी यासह विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येने भाग घेत
सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.गायन,एकल नृत्य, गृप नृत्य,फॅशन शो यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी उत्तम कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.काल बुधवारी सकाळच्या सुमारास प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडला.या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांचा सिंहाचा
वाटा होता.तसेच प्रा.श्रीकांत धोटे,प्रा.सुमेध मेश्राम, प्रा.आशिष डोंगरवार,प्रा.पंकज बोरकर,प्रा.नाकाडे,प्रा. झोया सय्यद,प्रा.हर्षा डोंगरवार,प्रा.डॉ.आशिष सेलोकर,प्रा.डॉ.सुनील चौधरी,प्रा.डॉ.चंद्रकांत शेंडे सह शिक्षकेत्तर कर्मचारी वैशाली ब्रह्मणे नंदकिशोर आतळकर यांचे सहकार्य लाभले.सदरचे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरून महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व क्रीडा परंपरेला नवा आयाम मिळाला आहे.
- Advertisement -