Monday, August 10, 2026
Homeचंद्रपूरमोठी बातमी; युवतीची धारदार शस्त्राने हत्या करणाऱ्या आरोपीने पोलीस कोठडीतच घेतला गळफास…-२४...

मोठी बातमी; युवतीची धारदार शस्त्राने हत्या करणाऱ्या आरोपीने पोलीस कोठडीतच घेतला गळफास…-२४ वर्षीय युवतीचे हत्या प्रकरण; प्रकरणाचा तपास गेला सीआयडीकडे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- जिल्ह्यातील प्रसिद्ध आनंदवनात मागील आठवड्यात झालेल्या युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव समाधान माळी असे आहे.वरोरा येथे २६ जून रोजी आरती दिगंबर चंद्रवंशी वय २४ वर्षे या युवतीची हत्या करण्यात आली होती.पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित आरोपी समाधान माळी याला २४ तासात अटक केली.

आरतीच्या हत्येमागे लव्ह,ब्रेकअप,मर्डर असे वळण असल्याचे पोलिस तपासात समोर आले.आरोपी समाधानला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.आरोपी समाधान माळी हा कुष्ठरोगी असून,तो एक वर्षाआधी आनंदवनात उपचाराला आला होता.तिथेच त्याचा परिचय आरतीशी झाला.दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान,आरोपीने रात्री पोलिस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केली.यामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

काल,२९ जून ला आरोपी समाधान माळीवर बलात्काराचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता; समाधानने आरतीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता.गुन्हा केल्यावर समाधान कुठेही पळून गेला नव्हता; पोलिसांनी समाधानला आनंदवनमधून अटक केली.मात्र,गुन्हा केल्यावर तो नैराश्यात गेला होता.

त्या नैराश्यातून त्याने आज,३० जून रोजी सकाळी  स्वतःच्या जोड्याच्या लेस ने गळफास घेतला.विशेष म्हणजे आरोपीला २४ तासाच्या आत अटक केली म्हणून पोलिस स्वतःची पाठ थोपटवीत होते.मात्र आरोपीने आत्महत्या केल्यावर पोलिसांचे बोट एकमेकांवर उठत आहे.पोलिसांच्या चुकीमुळे सदर प्रकार घडला असून आता या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे गेला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!