- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-चारित्र्याच्या संशयावरुन पती-पत्नीमधील भांडण विकोपाला गेले अन् पतीने पत्नीच्या डोक्यावर खलबत्त्याने वार करुन खून केला व नंतर शेजारील विहिरीत टाकले असल्याची घटना आज, बुधवार दिनांक-१६ ऑक्टोंबरला सकाळी ११ वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव या गावी घडली.स्नेहा लोकेश बाळबुद्धे वय ३२ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती लोकेश गुणाजी बाळबुद्धे वय ३५ वर्षे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,लोकेश बाळबुद्धे
हा नेहमी पत्नी स्नेहा च्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा.यात वडिलांनी हस्तक्षेत केल्यास वडिलांनाही दमदाटी करायचा आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास लोकेश व स्नेहा यांच्यात संशयावरून कडाक्याचे भांडण झाले.त्यावेळी लोकेशचे वडील गुणाजी बाळबुद्धे हे स्वतःची सायकल घेऊन दुरुस्तीसाठी गावात गेले होते.तर लोकेशची आई तिचे माहेर कोरेगावचे असल्याने माहेरी घरी गेली होती.लहान मुलगा घरीच दुसऱ्या खोलीत पलंगावर झोपेत होता.मोठा मुलगा शाळेत गेला होता.दोघा पती-पत्नीचे भांडण विकोपाला गेले व लोकेशने घरातील खलबत्ता उचलून स्नेहाच्या डोक्यावर एक ते दोनदा वार केला.डोक्यावर वार केल्याने स्नेहा गंभीर जखमी होऊन खाली कोसळली. स्नेहाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्या स्थितीत स्नेहाला मृत पावल्याचे समजतच लोकेशने तिला उचलून घराबाहेरील चौकातील विहिरीत नेऊन टाकले व स्वतः देसाईगंज पोलिसांसमोर जाऊन पत्नीला मारल्याची कबुली देऊन आत्मसमर्पण केले.देसाईगंज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून प्रेत विहिरी बाहेर काढून पंचनामा करून देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
लोकेशला दारूचे व्यसन होते.लोकेश बाळबुद्धे व त्याची पत्नी स्नेहा, लोकेशचे आई-वडील संयुक्त कुटुंबाने राहत होते. लोकेशला दोन मुले असून त्यातील मोठा मुलगा सहा वर्षाचा असून पहिल्या वर्गात शिकत आहे.तर लहान मुलगा तीन वर्षाचा असून तो अंगणवाडीत जात आहे. आईचा मृत्यू झाल्याने दोन्ही मुलांवरील छत्रछाया हरपल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर,पोलीस उपनिरीक्षक माने,पोलीस जमादार गेडाम हे करीत आहेत.
- Advertisement -