उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- अदाणी-हिडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायाधीश पीएस नरसिम्हा आणि जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी चौकशी करण्याची गरज आहे.असे सांगत कोर्टाने सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे.इतकेच नव्हे तर सेबीचीही या प्रकरणाची चौकशी सुरूच राहणार आहे.या समितीला दोन महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.