Friday, September 25, 2026
Homeकुरुडकुरूड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दहावी परीक्षा केंद्रास दिली भेट- शाळेतील शिक्षकांशी साधला संवाद..

कुरूड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दहावी परीक्षा केंद्रास दिली भेट- शाळेतील शिक्षकांशी साधला संवाद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरूड :- विद्यार्थ्यांच्या दहावी बोर्डाची परीक्षा आज २ मार्च पासून सुरू झाली आहे.यानिमित्ताने देसाईगंज तालुक्यातील कुरुड ग्रामपंचयतीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या कुरुड परीक्षा केंद्रास भेट देऊन शाळेतील शिक्षकांशी संवाद साधून दहावी बोर्डाच्या परीक्षेस विद्यार्थी उपस्थिती संख्या,गैरहजर संख्या,पिण्याच्या पाण्याची सोय,कॉपी मुक्त अभियान व इतर बाबीं विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

तालुक्यातील कुरुड दहावी परीक्षा केंद्रामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल शाळा कुरुड,राधेश्याम बाब विद्यालय कुरुड,विद्या निकेतन लोकमान्य टिळक विद्यालय कोंढाळा व रेणुकाबाई उके विद्यालय शिवराजपुर या चारही विद्यालयातील विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परीक्षेला बसले आहेत.कुरूड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान १५३ विद्यार्थी परीक्षा देत असून १ विद्यार्थी गैरहजर असल्याचा आढळून आला.शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याची सोय व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शासनाच्या आदेशानुसार शाळेत कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येत असल्याचे शिक्षक संवादादरम्यान पदाधिाऱ्यांना माहिती देण्यात आली.

दहावी परीक्षा केंद्रास भेटी दरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.सदर परीक्षा केंद्रास भेटी प्रसंगी कुरुड ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रशाला गेडाम,उपसरपंच क्षितिज उके,ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम,सदस्या आशाताई मिसार,अविनाश राघोर्ते व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!