उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी :- तालुक्यात अवैधरित्या रेती तस्करी बरोबरच तस्करांचा कल अवैधरित्या मुरूम उत्खननाकडे वाढलेला दिसून येत आहे. महसूल विभागाकडून मुरूम उत्खननाचा शंभर ब्रासचा रीतसर परवाना मिळवून त्यापेक्षा अधिक मुरुमाची वाहतूक करून शासनास लाखो रुपयांचा चुना लावल्या जात असल्याने अशा अवैधरित्या उत्खनन करणाऱ्यांचे परवाने रद्द करून व उत्खनन केलेल्या ठिकाणचा मोका पंचनामा व चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.
काही मुरूम तस्कर कुठल्याही प्रकारचा महसूल विभागाकडून रीतसर वाहतूक परवाना न घेता अवैधरित्या उत्खनन करतांना दिसून येत आहेत.त्याहीपेक्षा रॉयल्टी काढून परवाना घेतलेले काही तथाकथित एका वाहतूक परवाण्यावर तीन ते चार ब्रास अवैधरित्या वाहतूक करतांना दिसून येतात एका वाहतूक परवाण्यावर सकाळचा कालावधी दिलेला असेल तर तोच वाहतूक परवाना दुपारच्या सुमारासापर्यंत चालविण्यात येतो आहे.एखादा अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी वाहतूक परवाना तपासले असता उडवाउडवीची उत्तरे त्यांच्याकडे तयारच असतात.कधीकधी तर चक्क काही नागरीकांना खरेदीची वाहतूक परवाने सुध्दा दिली जात नाही. त्यामुळेच अवैध उत्खनन करण्यास चालना मिळून शासनास लाखो रुपयांचा चुना लावल्या जातो आहे.यासाठी महसूल विभागाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
अवैधरित्या मुरूम उत्खनन करण्याऱ्यांवर कठोर कारवाई करून,उत्खनन केलेल्या ठिकाणचा मोका पंचनामा करून,अवैध गौण खनिज प्रकरणी कारवाई करण्यात यावी.अशी मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.