Saturday, June 27, 2026
Homeचंद्रपूर'मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त...- प्रतिभा धानोरकर…-एक्झिट पोलमुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उरली नाही सीमा…

‘मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त…- प्रतिभा धानोरकर…-एक्झिट पोलमुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उरली नाही सीमा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- ज्या लोकसभा मतदारसंघाने काँग्रेसमुक्त होण्यापासून महाराष्ट्राला वाचवले,त्या मतदारसंघाच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.हा मतदारसंघ आहे चंद्रपूर-वणी-आर्णी.एक्झिट पोलनुसार येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडीवर असतील; असे सांगण्यात येत आहे. धानोरकरांचा विजय निश्चित मनाला जात आहे. मतमोजणीला काही तास उरले असताना धानोरकर यांची प्रेस नोट धडकली.

यात उद्याचा निकाल हा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून देशाला कलाटणी देणारा ठरणार आहे.मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त आहे.जनतेनी सेवा करण्याची संधी दिल्यास संधीचे सोने करुन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी मी सदैव कटीबध्द राहील; असे धानोरकर म्हणाल्या आहेत. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच नाही तर राज्यात,देशात भाजपचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.उद्या कुणाच्या चेहऱ्यावर गुलाल उधळला जाईल,याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर राहतील, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडी घेतील असा एक्झिट पोल वर्तविण्यात आला आहे.प्रचाराचा सुरुवातीपासूनच धानोरकर यांनी आघाडी घेतली होती.सहानुभूती आणि जातीय समीकरणाचे बळ धानोरकरांना मिळाले होते.त्यात सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा नकळत फायदा धानोरकरांना झाला.

भाऊ बहिणीच्या नात्यावर मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महिला मतदारात कमालीची नाराजी होती.मोठ्या संख्येने महिलांचा पाठिंबा धानोरकर यांना मिळाला होता.एक ते दीड लाख मतांनी धानोरकर विजयी होतील; असा दावा त्यांचे कार्यकर्ते आजही करीत आहेत.त्यात एक्झिट पोलमुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला सीमा उरली नाही. आता प्रतिभा धानोरकर यांनी मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त आहे; असे म्हटल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदी आनंद संचारला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!